Spread the love

   

खासदार सुधाकर शृंगारे यांची माहिती

 लातूर-(प्रतिनिधी)केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने रस्ते मार्ग निधीमधून लातूर जिल्ह्यातील  रस्त्यांच्या कामासाठी जवळपास ६८ कोटींचा निधी मंजूर केला आहे . या निधीमुळे  उदगीर ,जळकोट ,अहमदपूर ,शिरूर-अनंतपाळ ,देवणी आणि निलंगा तालुक्यातील रस्त्यांची कामे पूर्ण करता येणार आहेत .विशेष म्हणजे अहमदपूर तालुक्यातल्या शेणकूड  येथे असलेल्या नदीवर  उभारण्यात येणाऱ्या  पुलाचे कामही पूर्ण करता  येणार आहे . लातूर लोकसभा मतदार संघातील रस्त्यांच्या उभारणीसाठी जास्तीत जास्त निधी देण्यात यावा अशी मागणी खासदार सुधाकर शृंगारे  यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती . त्या मागणीला लक्षात घेऊन रस्ते मार्ग निधी म्हणजेच सीआरएफ फंड मंजूर करण्यात आला आहे . लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात रस्त्यांची कामे सुरु  आहेत , त्यांना निधीची आवश्यकता  असल्याने  केंद्र सरकारच्या माध्यमातून  जास्तीत जास्त निधी उपलब्ध  व्हावा यासाठी खासदार सुधाकर शृंगारे  यांचे प्रयत्न सुरु आहेत . मंजूर करण्यात आलेल्या ६८ कोटी रुपयांच्या निधी मध्ये प्रामुख्याने चार रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत . निटूर-शिरोळ -हेळंब- या रस्त्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे . तर उदगीर तालुक्यातल्या जानापुर ते शिरोळ या सीमावर्ती भागातील रस्त्यासाठी १८ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. अहमदपूर आणि जळकोट तालुक्यातल्या हासरणी, सावरगावथोट , सोरगा,वडगाव,केकतसिंदगी  या रस्त्यासाठी १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत .  अहमदपूर तालुक्यातल्या खंडाळी,काळेगाव,अहमदपूर,शिरूर-ताजबंद,उदगीर या रस्त्यासाठी १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत . याच निधीमधून अहमदपूर तालुक्यातल्या शेणकुड  गावाजवळ असलेल्या नदीवरील पूलाचेही काम पूर्ण करण्यात येणार आहे .  जिल्ह्यात  सुरु असलेल्या महामार्गांच्या कामा बरोबरच आता निधी मिळाल्याने राज्य रस्ते आणि ग्रामीण रस्त्यांची कामे पूर्ण होणार आहेत . ६८ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल खासदार सुधाकर शृंगारे  यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत .  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आदेश काढत लातूर जिल्ह्यातल्या  चार महत्वाच्या रस्त्यांसाठी  ६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे म्हंटले आहे . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!